कोणी काहीही म्हणू दे आपण आपलं
प्रामाणिक काम करत राहायचं असतं
खरं आहे मित्रहो आपलं काम बोलतं.
आपल्या खऱ्या कामाला नावं ठेवणाऱ्या
लोकांचं जास्त मनावर घ्यायचं नसतं
खरं आहे मित्रहो आपलं काम बोलतं.
असत्याचा थोडे दिवस उदोउदो झाला
तरी सत्य कधी लपत नसतं
खरं आहे मित्रहो आपलं काम बोलतं.
तुमचा हेतू प्रामाणिक असेल तर
त्या चांगल्या कामाचे फळ नक्की मिळतं
खरं आहे मित्रहो आपलं काम बोलतं.
कधी कधी आपलं काम लोकांचे आशीर्वाद
आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंदातून कळतं
खरं आहे मित्रहो आपलं काम बोलतं.
कामाप्रती नेहमी प्रामाणिक राहणं
आयुष्यात फायदेशीर ठरतं.
खरं आहे मित्रहो आपलं काम बोलतं.
नकारात्मकतेच्या वलया पेक्षा सकारात्मकतेच वलय
कायमस्वरूपी देदीप्यमान कामगिरी करतं
खरं आहे मित्रहो आपलं काम बोलतं.
– प्रेमा
November 24, 2021 at 3:56 am
अतिशय खरय…. कोणी काहीही बोललं तरी आपल्याला जे बरोबर वाटतं ते करत रहावं… 👍👍👍
November 24, 2021 at 4:29 am
धन्यवाद दादा!🙏😊
November 24, 2021 at 8:55 am
मग काय तर. सत्याने ऊशीरा का होईना विजयच मीळतो
November 24, 2021 at 9:11 am
हो ना.
धन्यवाद!🙏😊
November 25, 2021 at 3:03 am
That’s the spirit and it will take you higher and higher in all you do.
November 25, 2021 at 3:31 am
Thank you so much Tai.🙏😊