मी कामात व्यस्थ असले
की तू पण सुस्त बसतेस,
कमाल करतेस कविता
तू पण कमाल करतेस.😊
वेळी अवेळी माझ्या मनात
हळूच तीमतीमुन जातेस,
कमाल करतेस कविता
तू पण कमाल करतेस.🥰
ऐन झोपेच्या वेळीच माझ्या
सभोवताली गुणगुणत राहतेस,
कमाल करतेस कविता
तू पण कमाल करतेस.🤩
कधी कधी अचानक हुलकावणी
देऊन दूर पळून जातेस,
कमाल करतेस कविता
तू पण कमाल करतेस.🙄
झोपेत असताना मध्येच जागवून
तुला हवे ते वदवून घेतेस,
कमाल करतेस कविता
तू पण कमाल करतेस.😏
तुझ्या मनात आले की दिवसभर
विचारांचा पिंगा घालत बसतेस,
कमाल करतेस कविता
तू पण कमाल करतेस.😍
तू आहेस प्रेमाची आवडती सखी
म्हणून हट्टाने सर्व लाड पुरवून घेतेस,
कमाल करतेस कविता
तू पण कमाल करतेस.😘
– प्रेमा
November 27, 2021 at 2:03 pm
तु पण कमाल लिहीतेस प्रेमला… तु पण कमाल लिहीतेस …..
November 27, 2021 at 2:15 pm
Thanks Dear.🙏🥰
November 27, 2021 at 2:06 pm
Wah!!! Mastach
November 27, 2021 at 2:16 pm
Thank you Tai.🙏😊
November 27, 2021 at 2:34 pm
खूपच कमाल 👍👍👍
ही अनूभुती सर्वच कलाकारांना येते 👍
November 27, 2021 at 5:20 pm
धन्यवाद दादा.🙏😊
November 28, 2021 at 3:28 am
खरय. ही कविता श्वासा सारखी आपल्यातच असते. जिवंत ठेवते सतत मनात रूंजी घालते. अबोल व्यक्तीस बोलतं करते
तरी सर्व लोक विचारतात तू कविता का लिहीते..
November 28, 2021 at 4:57 am
हो ना.😀
धन्यवाद!🙏😊