काही मित्र असतात नेहमीच गोड बोलणारे;
पण नेमकं तुमच्या अडचणीला लांब पळणारे.
काही मित्र असतात कामापुरते नेमक्या शब्दात बोलणारे;
पण कोणत्याही अडचणीला पटकन धावून येणारे.
काही मित्र असतात पार्ट्या करत फिरणारे;
पण तुमची वेळ आली की पळ काढणारे.
काही मित्र असतात टवाळक्या करत फिरणारे;
पण मैत्रीच्या प्रेमळ भावना मनोमन जपणारे.
काही मित्र असतात कमी वेळ देणारे;
पण मैत्रीसाठी निस्वार्थी भाव जपणारे.
काही मित्र असतात नको त्या चुका लपवणारे;
पण वेळ आली की तुम्हालाच तोंडावर पडणारे.
काही मित्र असतात चुकीवर खडे बोल सूनवणारे; पण तुमच्या संकटकाली जीवाला जीव देणारे.
काही मित्र असतात पाया पडून मदत मागणारे;
पण वेळ आली की तुम्हालाच चुना लावणारे.
काही मित्र असतात खडूस नावाने बदनाम होणारे; पण तुमच्या पडत्या काळात नेहमी धीर देणारे.
मैत्रीच्या कोणत्या तऱ्हेत बसायचं हे आपणच ठरवणारे,
मैत्रीचा प्रकार पण शेवटी आपणच निवडणारे.
काही मित्र असतात वेळीच डोळे उघडणारे,
तुम्हाला जीवनातील योग्य मार्ग दाखवणारे.
– प्रेमा
November 30, 2021 at 4:05 am
Mi konchya shrenit baste!??!
Nice annalysis.
November 30, 2021 at 4:07 am
तोंडावर ऐकवून मदतीला धावून जाणाऱ्या😀
Thank you.🙏😊
November 30, 2021 at 5:33 am
True.
खूप छान वर्णन
मी कुठल्या केटेगरीत बसते. ? बोलघेवडी?
प्रत्येकात काहीतरी गुणदोष असतातच. चांगलं बघावं नी मैत्री करावी. मला पण सगळे प्रकार चे मीत्र मैत्रीणी आहेत.
हो. खडे बोल सूनवणारे कर. सडे नको. ( औटोस्पेल)
November 30, 2021 at 5:58 am
छान.
धन्यवाद!🙏😊
December 1, 2021 at 2:58 am
Where Do I am Fitting 🌷
December 1, 2021 at 5:18 am
शोधाल तर सापडेल.😀
धन्यवाद!🙏😊