आज माझ्या वहिनीबाईचा वाढदिवस
आज तुझा खूप खूप आनंदाचा दिवस
तू एक कवयत्री म्हणून मनाला भावतेस
मनातील भावनांचा खेळ सर्वांना दावतेस
मिञ मैत्रिणींच्या घोळक्यात छान रमतेस
सर्व भान विसरून मनसोक्त गप्पा मारतेस
कवी, गायिका, डान्सर या गुणांना वाव देतेस
काम आणि घर सांभाळत छंद आनंदाने जपतेस
तोंडावर हात ठेवून खूप भारी लाजतेस
जा बाई प्रेमा हे वाक्य तू छान म्हणतेस
तुझे ते गोड हास्य कायम चेहऱ्यावर असू दे
तुझ्या प्रगतीचा आलेख नेहमी चढताना दिसू दे
पूर्ण होवो तुझ्या मनीच्या सर्व आकांक्षा व इच्छा
प्रिय रुपाली तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
– प्रेमा
December 1, 2021 at 7:50 am
Dear Rupali, you are blessed to have a sister in law like Prema. Wishing you a very happy birthday.
December 1, 2021 at 8:14 am
ती पण माझी मैत्रीण आहे ताई. मानस नात्याने वहिनी आहे.😊
Thank you.🙏😊
December 1, 2021 at 8:18 am
वाहहहह वाहहहह वाहहहहह… क्या बात है…
खूप सुंदर… भावतं मनाला…
तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 👍👍👍
December 1, 2021 at 9:20 am
धन्यवाद दादा!🙏😊