समाजहितासाठी नेहमी धडपडत राहणारी
लोकांच्या मदतीला कायम धावून जाणारी

मायेचा कप्पा सतत खुला ठेवणारी
भेट झाली की हसत गप्पा मारणारी

सगळ्यांनी डान्स करावा म्हणून मागे लागणारी
कामातून वेळ काढून डान्सचा छंद जोपासणारी

नावा प्रमाणे मायेने चौकशी करणारी
वय न पाहता कायम मैत्री जपणारी

भेट झाली की डार्लिंग शिवाय न बोलणारी
एकत्र जॉईन झाल्याच्या गप्पात रंगणारी

माया आणि प्रेमाच्या आठवणी ताज्या ठेवणारी
जीवनात धाडसी आणि आशावादी असणारी

अशा मैत्रीण मायाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
– प्रेमा