चहाच्या टपरीवर गप्पांचा फड रंगला
प्रेमी युगलांना भटकंतीचा पारा चढला
महाबळेश्र्वर आज पुण्यात अवतरला.❤️

बघाल तिकडे धुके आणि रिमझिम पाऊस झाला
रस्ता आणि निसर्ग अतिशय आनंदाने खुलून गेला
महाबळेश्र्वर आज पुण्यात अवतरला.🌧️

पुण्यातील पर्वती, सारसबाग, खडकवासला
सोबतच सिंहगडही आज पर्यटकाने फुलला
महाबळेश्र्वर आज पुण्यात अवतरला.👫

पावसा सोबतच गारगार वारा सुटला
धुक्याचा परिसर प्रेमाला आल्हाददायक वाटला
महाबळेश्र्वर आज पुण्यात अवतरला.☺️

थंडीत पर्यटक प्रेमाचा चहा घेत बसला
प्रेमी लोकांनी हा परिसर आनंदाने गाठला
महाबळेश्र्वर आज पुण्यात अवतरला.😘

हे सुंदर वातावरण पोषक असे प्रेमाला
मोकळी वाट मिळत असे प्रेम भावनेला
महाबळेश्र्वर आज पुण्यात अवतरला.😍

अख्खा परिसर आज धुके व थंडीने गारठला
आज पुणेकरांनी सूर्योदय ना सूर्यास्त पाहिला
महाबळेश्र्वर आज पुण्यात अवतरला.🌞

प्रत्येक पुणेकर आज गुलाबी थंडीने शहारला
येथील सर्व परिसर निसर्गप्रेमाने बहरला
महाबळेश्र्वर आज पुण्यात अवतरला.🥰

ठेवणीतील रेनकोट ऐन हिवाळ्यात बाहेर आला
पुणेकरांनी हिवाळ्यात पण पावसाळा अनुभवला
कारण महाबळेश्वर आज पुण्यात अवतरला.💝
– प्रेमा