निर्मात्याने एवढं सुंदर मन देऊनही काही लोकांच्या मनात एवढे विष कसे भरते काही कळत नाही.🙄

लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात विष पसरविण्याचे काम करणाऱ्या काही लोकांच्या मनात एवढे विष कसे भरते काही कळत नाही.🙄

प्रभूच्या गप्पा करणारे तर सगळ्यांना करुणा भाकतात; मग काही लोकांच्या मनात एवढे विष कसे भरते काही कळत नाही.🙄

द्वेषाने भरलेले लोकं इतरांना वेळोवेळी कमी लेखण्याचा प्रयत्न करतात; या लोकांच्या मनात एवढे विष कसे भरते काही कळत नाही.🙄

ईश्वराची पूजा अर्चा करणारे तर सगळ्यांना आनंद देतात; मग काही लोकांच्या मनात एवढे विष कसे भरते काही कळत नाही.🙄

लोकांची बदनामी करणारे तर स्वतःच मानसिक समस्येने पिडलेले असतात; म्हणून काही लोकांच्या मनात एवढे विष कसे भरते काही कळत नाही.🙄

असे दुसऱ्यां विषयी मनात अतोनात भरलेले विष या लोकांनाच कधी संपवतं; हे या विषारी विचारांच्या लोकांना पण कळत नाही.🙄

माणुसकीच्या गप्पा मारून चालत नाही तर ती कृतीतून दाखवून दिली; तर नक्कीच काही लोकांच्या मनात एवढे विष भरणार नाही.🙄
– प्रेमा