फोटो काढण्यासाठी उभा राहिले की, केस अस्ताव्यस्त करून जातो असा हा खट्याळ वारा.🙄

खोल दरीचा कानोसा घेताना हळूच कानाशी हितगुज करतो असा हा खट्याळ वारा.😊

तुझ्या आठवणीत मग्न होताना हळूच भालाशी स्पर्शून जातो असा हा खट्याळ वारा.😘

थंड हवेचा आनंद घेत असताना प्रेमाने गुणगुणत राहतो असा हा खट्याळ वारा.☺️

दूर आसमंतात नजर फिरवताना स्वतःच्या अस्तित्वाची जाणिव करून देतो असा हा खट्याळ वारा.🥰

प्रेमी युगलांना प्रेमाची आठवण करून देतो असा हा खट्याळ वारा.😍
– प्रेमा