काय सांगावी या थोर व्यक्तीच्या कार्याची महती,
समाजसुधारणेची अतिशय खडतर ती वेळ होती.
केशव आणि लक्ष्मीबाई यांच्या पोटी धोंडो नामक एक थोर व्यक्ती जन्माला आला,
वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचा राधाबाईंशी विवाह झाला.
पत्नी निधना नंतर त्यांनी विधवा महीलेशीच विवाह करेन असा चंग बांधला,
गोदूबाई या विधवा मुलीशी पुनर्विवाह करून त्यांनी आपला शब्द पाळला.
भविष्याचा विचार करून अण्णांनी सहा विधवा महिलांसह ‘अनाथ बालिकाश्रम‘ काढला,
तसेच पुण्याजवळील हिंगणे या गावी विधवा महिलांसाठी आश्रम स्थापन केला.
विधवा विवाह प्रतिबंध निवारक‘ मंडळाची स्थापना केली,
मुलींचे शिक्षण पुढे आडू नये अशी मनाशी गाठ बांधली.
भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची पुण्यात स्थापना केली,
एवढ्यावरच न थांबता अध्यापिका विद्यालयाची सुरुवात केली.
असा हा दूरदृष्टी समाजसुधारक सहज नाही घडला,
यासाठी त्यांना समाजाचा मोठा रोष पत्करावा लागला.
समाजाची पर्वा न करता ज्यांनी विधवा पुनर्विवाहचा पाया रोवला,
साष्टांग दंडवत माझा थोर व्यक्ती भारतरत्न धोंडो केशव कर्वेना.
– प्रेमा
Leave a Reply