खोटी वाह वाह मिळवणाऱ्याला खरे बोलणे पटत नाही,
गोड बोलून आणि तळवे चाटून मिळालेली सत्ता जास्त दिवस टिकत नाही. 👍😀
खोट्यांची ही टोळी सारी जास्त दिवस टिकत नाही,
प्रामाणिकपणे पैसा मिळवतो, तुमच्या सारखा फुकट नाही.👍😀
माज आम्हाला तुमच्या सारखा फुकट नाही,
घाम गाळून काम करतो, खोट्या पुढे झुकत नाही.👍😀
अभिमान आम्हाला सच्चेपणाचा कोणा पुढे झुकत नाही,
दिड दमडीच्या लोकांसाठी स्वाभिमान आम्ही विकत नाही.👍😀
कोणत्याही लालसेपोटी स्वाभिमान आम्ही विकत नाही,
पिल्लावळीच्या खोट्या स्तुतीने मन आमचं सुकत नाही.👍😀
तुमच्या कमी लेखण्याने विचार आमचे सुकत नाही,
कितीही लावा फिल्डींग लोकहो नशिबाच्या येण्याला कोणी कधी मुकत नाही.👍😀
– प्रेमा
December 8, 2022 at 11:48 am
Wwwaahhh wwwaahhh… khooopach chhaannn
December 8, 2022 at 12:04 pm
Thanks Dada.🙏😊
December 8, 2022 at 1:19 pm
क्या बात हे….
December 8, 2022 at 2:07 pm
Perfectly said.
December 29, 2022 at 4:30 am
Thank you.🙏😊