सिद्धनाथ तीन गोष्टी सांगतो हळूहळू,

पराग मान डोलवतो चला बोलू बोलू. 😝😝

 

परागची क्रिकेटवर भारी पकड,

कमेंट वाचून काढेल मोदी काकांची अकड.🤣🤣

 

पॉडकास्ट साठी फक्त पराग नाव काफी,

कॉपी पेस्ट काकांना मागावी लागणार एक दिवस त्याची माफी. 😝😝

 

कमेंट घेण्याची परागची शैली अगदीच छान,

एकच कमेंट परत परत करून, नका करून घेऊ अपमान. 🤣🤣

 

परागला तुम्ही जास्त सतावू नका पॉडकास्ट कुटुंबीय राव,

तुमच्या सतावण्याने पराग पण खाईल विनायक सारखा भाव.😝😝

 

पॉडकास्ट कुटुंबीय त्रास देऊ नका पाठकांना फार,

पहिल्यांदाच पॉडकास्टवर परागला बघून झाली प्रेमाची कविता तयार. 🤣🤣

 

पराग आज आला घालून मोदी की, नेहरू कोट,

मोदी काका त्याच्या आडनावाकडे तुम्ही उगाच का करताय बोट?😝😝

 

परागचे आडनाव ऐकुन कॉपी पेस्ट काका आनंदी झाले,

पॉडकास्ट मध्ये दिक्षित नंतर आता पाठक आले.🤣🤣

 

आज पॉडकास्ट छान झालं म्हणून सगळे नाचा,

सिध्दनाथ आणि पराग तीन गोष्टी नंतर प्रेमाची कविता वाचा.😝😝

– प्रेमा