नको कोणता सत्कार न नको कोणता मान,

सैनिकाची पत्नी म्हणून जपा सन्मान.😊

 

खूप काही मागत नाही ती समाजाला दान,

सैनिक पत्नी असणं तिला मान.😊

 

सर्वस्व अर्पण करून ती देशाची शान,

एकटी स्त्री समान करू नका अपमान.😊

 

पती देशाच्या सीमेवरांना वाटतं तिला अभिमान,

तिरकी नजर तिच्यावर टाकून काढू धुळीत स्वाभिमान.😊

 

काही नको तिला तुमच्याकडून अमूल्यदान,

देताच तर दिवंगत सैनिकाला सन्मान द्या.😊

– प्रेमा