स्वार्थी ही दुनिया सारी

अन स्वार्थी हे चेहरे

कामापुरते पिंगा घालती

निर्लज्ज हे सारे.😒

 

स्वार्थी ही दुनिया सारी

अन स्वार्थी हे चेहरे

वेळ येताच पळून जाती

एकजात लालची हे सारे.😒

 

स्वार्थी ही दुनिया सारी

अन स्वार्थी हे चेहरे

काम होताच तोंड फिरवती

धोकेबाज हे सारे.😒

 

स्वार्थी ही दुनिया सारी

अन स्वार्थी हे चेहरे

तुकडा पाहून गळून पडती

स्वाभिमानाचे मुखवटे हे सारे.😒

 

स्वार्थी ही दुनिया सारी

अन स्वार्थी हे चेहरे

पैशासाठी मैत्रीचे नाते धाब्यावर ठेवती

माणुसकीचे दलाल हे सारे.😒

 

स्वार्थी ही दुनिया सारी

अन स्वार्थी हे चेहरे

पैशासाठी इमान विकती

नालायक हे सारे.😒

– प्रेमा