मिञांनो मी कधी बसत नाही आणि एकदा लिखाणाला बसले की, कविते शिवाय दुसरं काही सुचत नाही.😀

कवितेचा विषय कोणताही असो लिखाणाला बसले की, कवितेत वास्तवा शिवाय दुसरं काही येत नाही.😉

सभोवताली एवढ्या घटना घडताना पाहून लिखाणाला बसले की, कविता लिहिताना माझीच मी राहत नाही.☺️

अचानक विषय डोक्यात पिंगा घालत राहतो म्हणून लिखाणाला बसले की, समाजातील वास्तवाचं दर्शन दिल्या शिवाय राहत नाही.😊

समोर दिसणाऱ्या असहाय्य गोष्टींवर होणाऱ्या चर्चा ऐकून लिखाणाला बसले की, दुटप्पी लोकांना झटका मिळाल्या शिवाय राहत नाही.🙄

लिखाणाला बसले की, दैनंदिन जीवन, विविधरंगी निसर्ग, विविध स्वभावाची माणसं वाचताना नवीन रूप कळल्या शिवाय राहत नाही.🤗

– प्रेमा