माणुसकीचा धर्म क्षणोक्षणी स्वार्थी दुनियेला दाखवून.
स्वतः गोरगरीबांच्या चेहऱ्यावरचं हसू आजमावून पाहूया..
सगळेच स्वार्थी होतात आपण पण थोडं स्वार्थी होऊया…☺️

आपला स्वार्थ म्हणजे दुसऱ्यांना सुखी पाहून.
स्वतः आनंदी होऊन सुख आजमावून पाहूया..
सगळेच स्वार्थी होतात आपण पण थोडं स्वार्थी होऊया…☺️

आपला स्वार्थ म्हणजे गरजूंना मदत करून.
स्वतः आशीर्वाद घेऊन आनंद आजमावून पाहूया..
सगळेच स्वार्थी होतात आपण पण थोडं स्वार्थी होऊया…☺️

आपला स्वार्थ म्हणजे दुःखिताना सहानुभूती देऊन.
स्वतः सुखाचे वाटेकरी होऊन समाधान आजमावून पाहूया..
सगळेच स्वार्थी होतात आपण पण थोडं स्वार्थी होऊया…☺️

आपला स्वार्थ म्हणजे त्रासलेल्यांना मानसिक आधार देऊन.
स्वतः माणुसकीचे दुत होऊन हर्ष आजमावून पाहूया..
सगळेच स्वार्थी होतात आपण पण थोडं स्वार्थी होऊया…☺️

आपला स्वार्थ म्हणजे वैतागलेल्यांचे मन हलके करून.
स्वतः माणूसकी जपत प्रेमाचा वर्षाव आजमावून पाहूया..
सगळेच स्वार्थी होतात आपण पण थोडं स्वार्थी होऊया…☺️
– प्रेमा