आजूबाजूला पाहिलं तर कळेल की,
तुझ्या एकट्यावरच दुःखाचे सावट नाही.
थोडी विचारांना दिशा देऊन बघ
वेड्या जीवा, जग एवढे पण वाईट नाही.

जगून घे आनंदाने हे आयुष्य
परत येणार नाही.
फुलपाखराप्रमाणे बागड तुला
कोणी अडवणार नाही.

स्वतःला वेळ दिल्याशिवाय स्व चे
महत्त्व उमगणार नाही.
स्व जाणल्या शिवाय तुझ्यातला तू
तुलाच कळणार नाही.

निसर्गात फिरून आल्याशिवाय
त्याचे सौंदर्य व महत्त्व कळणार नाही.
तिथे जो निरामय आनंद आहे तो
इथे बसून कधीच मिळणार नाही.

दिवस उगवतो तसा मावळतो,
हा निसर्गाचा नियम आहे.
लक्षात ठेव मानवा हाच नियम
जीवसृष्टीसाठी पण कायम आहे.
– प्रेमा