आठ ही वेळ सुरू होण्याची पॉडकास्ट,

सर्व सदस्य जमा होतात इथे एकदम फास्ट.🏃‍♀️

बातम्यांपुरतेच मर्यादित राहिले नाही पॉडकास्ट,

आपुलकीने एकमेकांची विचारपूस होते इथे जास्त.🤗

काही सदस्य बालिश कमेंट मधून टार्गेट साधतात विशिष्ट,

खोचक कमेंट मजेशीरपणे घेणे हे पॉडकास्टचे वैशिष्टे.☺️

उगाच वाईट कमेंट करणारे नेहमीच होतात इथे ट्रोल,

पॉडकास्टच्या प्रेमाखातर खावे लागतात त्यांना सर्वांचे बोल.😂

पॉडकास्टच्या निमित्ताने इथे खूप छान मित्र मैत्रिणी मिळतात,

खासियत ही की हे सदस्य आपल्या कुटुंबाचा भाग बनतात.🥰

पॉडकास्ट टीमने सगळ्यांना ठेवले आहे प्रेमाने बांधून,

सगळे ऑनलाईन भेटतात पॉडकास्टची संधी साधून.🤩

– प्रेमा