लहानपणापासूनच माझा आवडता राजा छत्रपती शिवाजी,
आपला इतिहास सांगतो मारली त्यांनी अनेक तहात बाजी.
स्वराज्यासाठी जगताना जीवाची पर्वा नाही केली थोडीही,
इतिहासातील ग्रंथ, कथा देतात त्यांच्या शौर्य आणि पराक्रमाची गवही.
सर्व गुण संपन्न आणि नीतिमूल्ये जपणारा राजा अशी त्यांची ख्याती,
आजच्या तरुणांनो स्वतःच्या अंगी बाणवून घेऊया की थोडीशी ती.
गनिमी काव्यात कोणीच धरू शकला नाही त्यांचा हात,
हा आदर्श घेऊन सध्य परिस्थितीवर आपण का करू शकत नाही मात.
महाराज फक्त मूर्तीत बंदिस्त होऊन चालणार नाही,
देशावर येणारे मोठे संकट कोणाला पेलणार नाही.
आता महाराजांना आपण कृतीतीतून जिवंत ठेवूया,
परत शिवरायाचे सर्वसमावेशक स्वराज्य घडवूया.
– प्रेमा
February 19, 2022 at 3:49 am
छानच
February 19, 2022 at 4:18 am
धन्यवाद!🙏😊
February 19, 2022 at 4:40 am
Badhiya!!!!
February 20, 2022 at 7:41 am
Thank you.🙏😊
February 19, 2022 at 4:43 am
Kya baaat hai
Kya baaaaat hai
Kya baaaaaaat hai…..
Khooopach masstt 👍👍👍
अतिशय सुंदर संदेश दिलायस यातून 👍👍👍
February 20, 2022 at 7:41 am
Thank you Dada.🙏😊