दिसले लोकं की ठोका भाषण,
पद आहे म्हणून वागा कसेपण.
शेवटी सवयच ती..

आहे तोंड म्हणून बोला काहीपण,
आली मीटिंग की सोडा माणूसपण.
शेवटी सवयच ती..

वेळेचा दुरुपयोग करतात कसापण,
चेल्यांची फौज असणे समजतात मोठेपण.
शेवटी सवयच ती..

समाजकारणात राजकारण करण्यात नसते हुशारपण,
अशा दुतोंडी वागण्याचा वचपा निघतो कधीपण.
शेवटी सवयच ती..

जास्त दिवस टिकत नाही असे चापलुसपण,
उशिरा का होईना महत्त्व पटवून देई साधेपण.
शेवटी सवयच ती..

सहज मिळालेल्या पदाने येत नाही शहाणपण,
त्यासाठी नेहमी जपावे लागते माणूसपण.
शेवटी सवयच ती..

कितीही हातपाय मारले तरी जास्त दिवस टिकत नाही खोटेपण,
वेळ आली की विधाता बाहेर काढतो सगळे खरेपण.
शेवटी सवयच ती..
– प्रेमा