दिसले लोकं की ठोका भाषण,
पद आहे म्हणून वागा कसेपण.
शेवटी सवयच ती..
आहे तोंड म्हणून बोला काहीपण,
आली मीटिंग की सोडा माणूसपण.
शेवटी सवयच ती..
वेळेचा दुरुपयोग करतात कसापण,
चेल्यांची फौज असणे समजतात मोठेपण.
शेवटी सवयच ती..
समाजकारणात राजकारण करण्यात नसते हुशारपण,
अशा दुतोंडी वागण्याचा वचपा निघतो कधीपण.
शेवटी सवयच ती..
जास्त दिवस टिकत नाही असे चापलुसपण,
उशिरा का होईना महत्त्व पटवून देई साधेपण.
शेवटी सवयच ती..
सहज मिळालेल्या पदाने येत नाही शहाणपण,
त्यासाठी नेहमी जपावे लागते माणूसपण.
शेवटी सवयच ती..
कितीही हातपाय मारले तरी जास्त दिवस टिकत नाही खोटेपण,
वेळ आली की विधाता बाहेर काढतो सगळे खरेपण.
शेवटी सवयच ती..
– प्रेमा
September 29, 2021 at 8:03 am
Nice poem prema 👍
September 29, 2021 at 8:13 am
Thank you.🙏😊
September 29, 2021 at 8:26 am
वाहहहहह वाहहहहह… खूपच छान… सगळ्यांच्या मनात हीच भावना असते या लोकांबद्दल… 👍👍👍
September 29, 2021 at 10:32 am
हो ना. धन्यवाद!🙏😊
September 29, 2021 at 8:53 am
बरोबरचे. उगाचच नीरथ्रक काहीही बोलतात नी कोणालाही टार्गेट करून ऊकसवतात. छान मांडलय
September 29, 2021 at 10:33 am
धन्यवाद ताई.🙏😊
September 29, 2021 at 10:45 am
You have expressed the dirty political world so smoothly. It’s truly wonderful.. I like your range of subjects. Keep it up.❣️❣️❣️❣️
September 29, 2021 at 2:15 pm
Thank you Tai.🙏😊
September 30, 2021 at 3:01 am
खूप छान…
September 30, 2021 at 3:28 pm
धन्यवाद!🙏😊