शब्द फुकट आहेत म्हणून काहींना ते तोंडात घोळवायची खोड भारी,
हे लोक समज आणि अनुभव या दोन शब्दात नेहमी गफलत करी.😅
दुसऱ्यांना सांगण्या आधी स्वतःच यातील फरक समजून घ्यावा की सवारी,
अशाने स्वतःच स्वतःची नाचक्की करून घेता की बा तुम्ही पुढारी.😅
चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी नको ते बोलून अशा लोकांचा पचका होतो भारी,
मग स्वतःला सिद्ध करण्यासाठी सगळीकडे मी चांगला म्हणत बोंबलत फिरी.😅
स्वतःला सिद्ध करण्यासाठी जगाला उसने ज्ञान देत सकळीकडे बढाया मारी,
पण स्वतःच्या वागण्यात तुसभर बदल करणे येते यांच्या जिव्हावरी.😅
सत्ता आणि पदासाठी बिचारे किती अफरातफर करी,
पण लक्षात ठेवा मित्रांनो सत्य एक ना एक दिवस सर्वांच्या समोर येते कधीतरी.😅
– प्रेमा
January 9, 2022 at 6:09 am
Good political analysis. Mazhya dolya samor ek pravakta ale!!!!!
January 9, 2022 at 5:24 pm
Thank you so much.🙏😊