समोरचे काम सोडून
असं रोखून माझ्याकडे
बघू नकोस मी तुझ्या
नशिल्या डोळ्यात हरवेन.🤫
स्वतःचे भान हरवून
असं एकटक माझ्याकडे
पाहू नकोस मी तुझ्या
डोळ्यांच्या प्रेमात पडेन🤫
समोरील लोकांना विसरून
असं वेड्यासारखं मला
बघू नकोस मी तुझ्या
प्रेमळ डोळ्यात गुंतेन.🤫
विशेष व्यक्ती म्हणून
असं दंग होऊन
मला पाहू नकोस मी
तुझ्या हृदयात घर करेन.🤫
तुझ्याशी बोलताना
असं उतावीळ होऊन
मला बघू नकोस मी
तुझ्यातील तुला वेड लावेन.🤫
तुझ्या पासून दूर जाताना
असं डोळे भरून मला
पाहू नकोस मी कायम
तुझ्या मनात असेन.🤫
– प्रेमा
January 27, 2022 at 3:53 am
वाहहह वाहहह…. छानच 👍👍👍
January 27, 2022 at 9:08 am
धन्यवाद दादा.🙏😊
January 27, 2022 at 4:47 am
Masta!!! Very well written
January 27, 2022 at 9:09 am
Thank you Tai.🙏😊
January 27, 2022 at 5:53 am
मनातल्या चित्राला नुसत्या डोळ्यांनी बघताच येत नाही. प्रेम सुंदर रेखाटलय. प्रेमाने अलगद अगदी
January 27, 2022 at 9:09 am
धन्यवाद ताई.🙏😊