समोरचे काम सोडून
असं रोखून माझ्याकडे
बघू नकोस मी तुझ्या
नशिल्या डोळ्यात हरवेन.🤫

स्वतःचे भान हरवून
असं एकटक माझ्याकडे
पाहू नकोस मी तुझ्या
डोळ्यांच्या प्रेमात पडेन🤫

समोरील लोकांना विसरून
असं वेड्यासारखं मला
बघू नकोस मी तुझ्या
प्रेमळ डोळ्यात गुंतेन.🤫

विशेष व्यक्ती म्हणून
असं दंग होऊन
मला पाहू नकोस मी
तुझ्या हृदयात घर करेन.🤫

तुझ्याशी बोलताना
असं उतावीळ होऊन
मला बघू नकोस मी
तुझ्यातील तुला वेड लावेन.🤫

तुझ्या पासून दूर जाताना
असं डोळे भरून मला
पाहू नकोस मी कायम
तुझ्या मनात असेन.🤫
– प्रेमा