दिवस उजाडून मावळे
पर्यंत न संपणारे असे
माझ्या हसण्याचे कारण तू.😍

प्रेमाचा विषय निघाला
की वेळ न पुरणारा असा
माझ्या बोलण्याचा आशय तू.😍

मनसोक्त आयुष्य जगताना
कमी न पडणारा असा
माझ्या सहवासाचा सुगंध तू.😍

विचार करुनही न
उमगणारा गहन असा
माझ्या प्रेमाचा अर्थ तू.😍

खूप भटकंती करून
ही न संपणारा असा
माझ्या प्रवासाचा मार्ग तू.😍

आयुष्यात कधीही
कमी न होणारा असा
माझ्या जगण्याचा श्वास तू.😍

नवीन गोष्टींचा आनंद
कमी न करणारा असा
माझ्या स्वप्नांचा विषय तू.😍

आयुष्यात सगळं सुख
मिळवून देणारा असा
माझ्या जीवनाचा आस्वाद तू.😍
– प्रेमा