आजारी काळातील तुझी परिस्थिती
आठवली की, माझ्या काळजात चर्र होतं.😔

तुझा आजारी चेहरा समोर
पाहिला की, माझं मन सैरभैर होतं.😔

अजारापणातील तुला होणारा त्रास
पाहिला की माझं हृदय कासाविस होतं.😔

तुझा त्रासलेला आणि क्षीण आवाज
ऐकला की, माझं काळीज पिळवटून जातं.😔

आजारी असल्यामुळे तुझे आवडीचे पदार्थ
खाता आले नाही की, माझं मन दुःखी होतं.😔

अशक्तपणामुळे तुझे मागे मागे फिरणे
बंद झाले की, माझं हृदय आक्रोश करतं.😔
– प्रेमा