आकर्षण मला तुझ्या
मृग नयनांचे आहे
त्यांच्यामध्ये माझे
स्वप्न पाहण्याचे आहे.🤩
आकर्षण मला तुझ्या
सुंदर केसांचे आहे
त्यांच्यामध्ये स्वतःला
हरवून जाण्याचे आहे.🤩
आकर्षण मला तुझ्या
निरागस हस्याचे आहे
त्याच्यामध्ये स्वतःला कारण
म्हणून शोधण्याचे आहे.🤩
आकर्षण मला तुझ्या
रुबाबदार चालण्याचे आहे
त्याच्यामध्ये दंग होऊन
फक्त तुला पाहण्याचे आहे.🤩
आकर्षण मला तुझ्या
मधुर आवाजाचे आहे
त्याच्यामध्ये मग्न होऊन
तुला ऐकण्याचे आहे.🤩
आकर्षण मला तुझ्या
अस्मानी प्रेमाचे आहे.
त्याच्यामध्ये स्वतःला
वाहून घेण्याचे आहे.🤩
– प्रेमा
January 30, 2022 at 4:45 am
Kya baat hai 👍👍👍 massstach
January 30, 2022 at 5:16 am
Thank you so much Dada.🙏😊
January 30, 2022 at 5:08 am
Bahut khub likha hai!!!
January 30, 2022 at 5:17 am
Thank you so much Tai.🙏😊
January 30, 2022 at 10:59 am
😘😘😘❤️
अप्रतिम
January 30, 2022 at 6:35 pm
धन्यवाद!🙏😊