तुला कदाचित अंदाज नाही,
माझ्यासाठी काय आहेस तू?
माझा जीव की प्राण आहेस तू.🥰
पृथ्वीसाठी सूर्य जसा तसा,
माझ्यासाठी काय आहेस तू?
माझ्यासाठी खूप खास आहेस तू.🥰
पहाटे पहाटे पडणारं असं,
माझ्यासाठी काय आहेस तू?
माझं गोड स्वप्न आहेस तू.🥰
जगाला हेवा वाटावा असा,
माझ्यासाठी काय आहेस तू?
माझा अभिमान आहेस तू.🥰
सुखाची उधळण व्हावी असं,
माझ्यासाठी काय आहेस तू?
माझं सुंदर आयुष्य आहेस तू.🥰
तुझ्या सहवासाने मिळणारा असा,
माझ्यासाठी काय आहेस तू?
माझा निखळ आनंद आहेस तू.🥰
जगाचा विसर पडावा असं,
माझ्यासाठी काय आहेस तू?
माझं जिवाचं सुख आहेस तू.🥰
देवाच्या कृपेने मिळालेलं असं,
माझ्यासाठी काय आहेस तू?
माझं निरागस प्रेम आहेस तू.🥰
चांदण्याविन अधुरा चंद्र असा,
माझ्यासाठी काय आहेस तू?
माझ्या दिलाची धडकन आहेस तू.🥰
सर्वांना हवाहवासा प्रेमळ असा,
माझ्यासाठी काय आहेस तू?
या प्रेमाचा जीवनसाथी आहेस तू.🥰
– प्रेमा
January 31, 2022 at 7:47 am
Very romantic!!!? Chabuk lihila ahes!!!
January 31, 2022 at 7:52 am
Thank you so much Tai.🙏😊
January 31, 2022 at 11:26 am
❤️ ❤️ क्या बात है ❤️❤️
January 31, 2022 at 7:05 pm
धन्यवाद!🙏😊