मन तुझं लै लै निर्मळ हाय ग बाई,
सर्व मुलांची आहेस तू आवडती ताई.🥰

लहान मुलांमध्ये तू पण मुल होतेस,
त्यांच्या सोबत तू पण बागडतेस.😅

माणसांपेक्षा जास्त मुक्या प्राण्यांना जपतेस,
मायेच्या स्पर्शाने त्यांची भाषा जाणतेस.😘

तुझ्यातील स्पष्टवक्तेपणामुळे मनाला भावतेस,
तुझ्या खोडकर स्वभावामुळे मला तू आवडतेस.😍

चूक असेन तर समोरच्याचे शांत ऐकुन घेतेस,
पण चूक नसेन तर समोरच्याला भारी ऐकवतेस.😂

जीवनातील चढउतारांना धैर्याने सामोरे जातेस,
न डगमगता ताठ मानेने जगा समोर उभी राहतेस.☺️

काम व संसार सांभाळत तारेवरची कसरत करतेस,
उगाच अगावूपणा करणाऱ्यांना तू भारी भिडतेस.😚

“बाबो” हा शब्द उच्चारताना जोरात ओरडतेस,
मला सोडून बाकी सगळ्यांची भारी खेचतेस.😜

प्रशांत सर टीमची ही आपली खट्याळ जोडी
आगावू लोकांना उगाच वाटते खडूस आहे थोडी.🙄

तुझ्यातील चांगुलपणा असाच कायम राहो,
तुझ्या सर्व मनोकामना सहज पूर्ण होवो.🤗

तुझी कायम भरभराटी व्हावी हीच एक इच्छा,
प्रिय पूने तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🎁🎊🎉💐
– प्रेमा