बाकीच्यांचे माहिती नाही पण मला रोज रात्री,
हा कधी एकदाचा दूर होईल हा विचार येतो.🙄
हल्ली सगळे काम धाम बाजूला ठेवून फक्त
याच्या विचारातच माझा दिवस मावळतो.🙄
दुसरं कोणाची एवढी हिंमत नाही; पण
हा माठ रोज रात्री मला उगाच त्रास देतो.🙄
याच्या रोजचा जबरदस्त होणारा त्रास आठवला की, दिवस मावळताना माझ्या अंगावर काटा येतो.🙄
मला हळूच चकवा देत हा माझा जानी दुश्मन,
दिवसभर कुठे तरी दबा धरून बसलेला असतो.🙄
चला आज तरी शांत झोपायला मिळेल या विचारात आडवे झाले की, याचा त्रास हळूहळू सुरू होतो.🙄
हा लवकर जावा म्हणून सगळे काही उपाय केले; पण जाणे तर सोडा उलट मला रात्रभर जागवतो.🙄
या कोरड्या खोकल्याला माझी किव नाहीच आली,
बघा याच्या जागरणाने प्रेमाची कविता तयार झाली🙄
– प्रेमा
February 1, 2022 at 7:20 am
वा माठ भलताच त्रास द्यायचा ना.
February 1, 2022 at 7:33 am
देतो हो.😀
धन्यवाद!🙏😊
February 1, 2022 at 7:24 am
Mi nuktich hya trasa tun geli ahe tymule tuzhya bhavna ekdum hrudayat jaun bhidlya.
February 1, 2022 at 7:34 am
हो ना ताई.🤗
धन्यवाद!🙏😊
February 1, 2022 at 8:08 am
वाहहह वाहहह …. खूपच छान 😃👍👍
February 1, 2022 at 8:12 am
धन्यवाद दादा.🙏😀
February 2, 2022 at 12:52 am
खोकला… 😀. आवारा ओओओओओ 😀😀😀
February 2, 2022 at 7:27 am
बरं.😂
धन्यवाद!🙏😀