आमचं प्रेम एवढं आहे की,
दोघं एकत्रच आजारी पडतो
आणि एकमेकांना सावरतो.😀
आमचं प्रेम एवढं आहे की,
दोघांनाही सुरमई खूप आवडते
आणि दोघंही तिचा फडशा पाडतो.😀
आमचं प्रेम एवढं आहे की,
दोघांना एकदाच सर्दी होते
आणि एकमेकांचा रुमाल शोधून देतो.😀
आमचं प्रेम एवढं आहे की,
आमच्या दोघांत भांडणं लावण्याचा
प्रयत्न करणाऱ्या तोंडावर पाडतो.😀
आमचं प्रेम एवढं आहे की,
दोघांना भटकायला आवडतं
आणि कुठेही बोंबलत फिरतो.😀
आमचं प्रेम एवढं आहे की,
कोणाची खेचायची ते ठरवून
समारोच्याची शिस्तीत घेतो.😀
आमचं प्रेम एवढं आहे की,
एकाला काही त्रास झाला तर
दुसरा आपसूक कासावीस होतो.🥰
– प्रेमा
February 2, 2022 at 5:55 am
Very cute
February 2, 2022 at 7:28 am
Thank you.🙏😊
February 2, 2022 at 11:26 am
😀😀😀 पुण्यवान ओ
February 2, 2022 at 11:49 am
धन्यवाद हो.🙏😀
February 2, 2022 at 2:22 pm
Chan ga, very nice!
February 3, 2022 at 8:28 am
Thank you Tai.🙏😊