खळखळत्या झऱ्याच्या वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकून मिळतो तो आनंद..🤗
पँटालुन्स समोर बसून शेजारच्या वस्तीतून येणाऱ्या मुलांसोबत मनसोक्त गप्पा मारून मिळतो तो आनंद..🤗
गरजू व्यक्तीला मदत करून त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान टिपून मिळतो तो आनंद..🤗
समुद्रकिनारी वाळूवर लोळत रात्रीचे चांदणे पाहण्यात दंग होऊन मिळतो तो आनंद..🤗
गड, किल्ले, निसर्ग भटकंती करून ट्रेकिंग,
रॅप्लिंग करून मिळतो तो आनंद..🤗
खेळ व डान्स स्पर्धेत सहभागी होऊन
मनमुराद खेळून व नाचून मिळतो तो आनंद..🤗
समुद्रकिनाऱ्यावर बसून येणाऱ्या लाटांची
उंची मोजण्यात मग्न होऊन मिळतो तो आनंद..🤗
आवडते पुस्तक दिवसरात्र वाचून
पूर्ण करून मिळतो तो आनंद..🤗
समाजकार्यात स्वतःला निरपेक्ष
झोकून देऊन मिळतो तो आनंद..🤗
छोटे मोठे जोक करून दुःखीताला
हसवून मिळतो तो आनंद..🤗
समाजभान ठेवून मनाला योग्य
वाटेल तेच करून मिळतो तो आनंद..🤗
समाजात घडणाऱ्या घटना लेखणीतून
व्यक्त करून मिळतो तो आनंद..🤗
वरील सर्व गोष्टी करून मला
मिळतो तो स्व आनंद.🤗
तुम्ही पण कधीतरी अजमावून
पहा हा परम आनंद..🤗
– प्रेमा
January 26, 2022 at 9:51 am
Ha आनंद दोन घडीचा नसतो,
तो आयुष्याचं आनंदी करायचा मंत्र असतो!
January 26, 2022 at 9:53 am
खरं आहे ताई.👍
धन्यवाद!🙏😊
January 26, 2022 at 12:12 pm
हाच आनंद अगदी पदोपदी मिळतो… फक्त तशी आनंदी दृष्टी पाहीजे… 👍👍👍
January 27, 2022 at 3:37 am
धन्यवाद दादा.🙏😊