(आज बी बी सी मराठी पॉडकास्ट वर आम्ही दोघींनी (सुचिता मगर आणि मी) मिळून घातलेला गोंधळ.😂🤫😝)

प्रेमा- कुडकुत लहान मोठे सगळे गोधडीचा शोध घेई,😂
या थंडीने लोकांना खूपच घायाळ केलंय बाई.🙄😝😜

सुचि- थंडी सांगत आहे, अंडी खा
नाही तर म्हातारा साधू घे बाई🤣🤣🤣😂😂

प्रेमा- तुझं आपलं दुसरच काहीतरी सुरू असतं ताई,
अंडी नको मला सुरमई मासे हवेत बाई. 😛😛

योगिनी- नकोत अंडी, नकोत मजला मासे
आता नाशीकच मजला ऊटी भासे.🙄🙄

प्रेमा- महाबळेश्वर सोडून तुम्ही उटी का गाठताय ताई,
असे जवळचे सोडून पळत्याच्या मागे पडणे चांगले न्हाई. 😛😛

सुचि- मासे तळ समुद्रात गेले घाई घाई,
त्यांना वाटते प्रेमा त्यांना तळून खाईन बाई😂😂🤣

प्रेमा- सुरमई फ्राय फक्त माझी वाट पाही,😀
सुचे तू उगाच काहीपण बोलू नको बाई. 🙄🙄

सुचि- सागरी मासे कमी झाले बाई
त्यांना वाटे प्रेमा उपवास करून, जीवनदान देई😝😝

प्रेमा- उद्याच मी सुरमाईची भेट घेई,
ती स्वतःच उड्या मारत आनंदाने माझ्या पोटात जाई. 😂😂

सुचि-आजच मी समुद्रात जाळे टाकले बाई,
तुला बोंबील शिवाय दुसरा मासा काय भेटत न्हाई🤣🤣😂😂

प्रेमा- तू कितीही कर जाळे टाकण्याची घाई,🙄
पण सुरमई फक्त आणि फक्त माझीच होई. 😂😂

सुचि- सुरमई म्हणे पुण्यात समुद्र न्हाई😂😂🤣😝😝
उगाच तिथे मी का जाऊ बाई❓❓❓❓

प्रेमा- समुद्रात तुझे जाळे पसरणार नाही,🙄😂
उगीच माझ्या सुरमईला त्रास देऊ नको बाई. 🙄😛

सुचि- सुरमई म्हणते मी काय पुण्यात जात नसते बाई,
आपला वसई चा पचुबंदरच लई भारी ताई.😝

प्रेमा- तरी ती पुण्याची भेट घेण्यासाठी पळत येई. ❤️😛
तू काहीही कर तीचं माझ्यावरच प्रेम काही कमी होत न्हाई. 😂😂

सुचि- तुझ्यावर कितीही प्रेम असलं तरी, तिचा माहेरचा समुद्र माझ्याकडेच बाई
मी काय तिला पाठवत नसते तिकडे घाई घाई😝😝

प्रेमा- तुझ्या या गोंधळात ती माझ्याकडे आली पण ताई,😛
एकदम सुखाने चटक मटक करून मी तिचा उद्या आस्वाद घेई. 😋😂

– प्रेमा आणि सुचिता