“विश्वास” शब्द खूप लहान असला तरी
प्रत्येक नात्यात अत्यावश्यक आहे.🤞
“विश्वास” अर्थ खूप महान आहे म्हणून
माझ्या तुझ्यावर संपूर्ण आहे.🤗
“विश्वास” यावर जग दुनिया सुरू आहे
म्हणून तुझा माझ्यावर कायम आहे.🤞
“विश्वास” नात्यातील एक धागा आहे
म्हणून आपल्या प्रेमात तो सामावला आहे.🤗
“विश्वास” जीवनातील महत्त्वाची भावना आहे
म्हणून आपल्या नात्यात याला खूप मोठे स्थान आहे.🤞
“विश्वास” तुझ्यावरचा कधी कमी होणार नाही
याचे कारण म्हणजे आपले गहिरे प्रेम आहे.🤗
“विश्वास” आपल्या प्रेमाचा अविभाज्य घटक आहे
कोणत्याही परिस्थितीत तो आपल्या सोबत आहे.🤞
“विश्वास” तुझा माझ्यावर कायम दिसून येतो
म्हणून ही प्रेमा बिनधास्त आयुष्य जगते आहे.🤗
– प्रेमा
January 25, 2022 at 4:13 am
खूप सुंदर… अतिशय खरंय…. कुठलही नातं परिपक्व तेंव्हाच असतं, जेंव्हा ते विश्वासाच्या भक्कम पायावर उभं असतं … 👍👍👍
January 25, 2022 at 4:40 am
मनापासुन धन्यवाद दादा.🙏😊
January 25, 2022 at 7:19 am
Trust is the foundation for the castle of love. Mi
January 25, 2022 at 8:52 am
Thank you.🙏😊