दुरून डोंगर साजरे न

म्हणता कधीतरी जवळ

जाऊन पहावे, त्यातील

खाच खळगे पण मोजावे.😊

 

दुरून डोंगर सुंदर न

म्हणता त्याला जवळून

जाणुन घ्यावे, कुठला घाव

जिव्हारी लागला ते पण पहावे.😊

 

दुरून डोंगर छान न

म्हणता त्याचे दुःख जाणावे,

कशाने तो एवढं पोखरला

गेला याचे ज्ञान घ्यावे.😊

 

दुरून डोंगर मोहक न

म्हणता त्याला जवळून

अनुभवावे, कधीतरी त्याच्या

अश्रुत आपले अश्रू ढाळावे.😊

 

दुरून डोंगराचा तर्क न

करता त्याच्या सहवासात

राहावे, सोबत त्याच्या

आपल्यातील माणूसपण जपावे.😊

 

तर्क वितर्क न करता व्यक्तींना

पण सहज जाणून घ्यावे,

त्यांच्या सोबत पण आपल्याला

विना अट आनंदाने राहता यावे.😊

– प्रेमा