काय सांगू तुला या दिलाचे हाल?
तुला पाहिल्या शिवाय
माझा दिवस जात नाही,
हा रुसवा सोड ना ग राणी.🙄

कसा मनवू तुला बोलण्यासाठी?
तुझ्याशी बोलल्या शिवाय
मला खरंच राहवत नाही,
हा अबोला सोड ना ग राणी.🙄

कसा करू तुला गप्पांसाठी राजी?
तुझा मधुर आवाज ऐकल्या विना
मला जेवण जात नाही,
ही नाराजी सोड ना ग राणी.🙄

कसा देऊ तुला विश्वास खरा?
तुझ्या सहवासातील प्रेमा
वाचून मला काही सुचत नाही,
हा नखरा सोड ना ग राणी.🙄

कसा समजावू तुला प्रेमाचे भाव?
तुझ्या शिवाय या आयुष्यात
माझे दुसरे कोणी नाही,
हा राग सोड ना ग राणी.🙄

कसा सांगू तुला मनाची व्यथा?
तुझ्या आठवणी शिवाय
एक क्षण जात नाही,
हा दुरावा सोड ना ग राणी.🙄
– प्रेमा