आई बाबांची आहेस तू लाडकी लहान परी,
आयुष्यात घेऊन आली आहेस तू आनंदाच्या सरी.🤗

चुरमुरे, पोहे, पापडचा करतेस घरभर पसारा,
आई बाबांचा दिवस जाई तो आवरण्यात सारा.😂

कृष्णा ताईची आहेस तू लाडकी बाहुली,
तुझ्या रुपात सगळ्यांना दिसे तिची सावली.☺️

लॉकडाऊन मुळे ताई आणि बाबांचा वेळ तुला मिळाला,
त्यामुळे तुझ्या संगोपनात त्यांचा हातभार लागला.🥳

तुझ्या बाललीला घरचा सदस्य प्रत्यक्ष अनुभवतो,
तर आम्ही तुझी किस्से ऐकूनच खूप खुश होतो.😇

तुझे पुढील सर्व आयुष्य आनंदात जावो हीच एक सदिच्छा,
प्रिय अभिज्ञा तुला बीबीसी पॉडकास्ट टीमकडून वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.🎂🎁🥳🎊💐
– प्रेमा