चैत्र महिन्याच्या दिवस उजाडला
हिंदू नववर्षाचा पहिला सण आला
अवघा महाराष्ट्र गुढींनी छान सजला.🚩

लहान मुले तयार होतात खाण्यासाठी गाठी
थोर सर्व झटतात बाल गोपालांच्या आनंदासाठी
या नववर्षाच्या सणाची ही किमया मोठी.🚩

आपापसातील गैरसमज, द्वेष, भांडण, राग सारा विसरूया
जीवनातील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, आनंद पसरूया
सर्व मतभेद विसरून लोकांना आपलेसे करूया.🚩

हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचे जावो
आयुष्यात सर्वांची प्रगती होवो
समाधानाचे जीवन जगता येवो.🚩

चांगल्या गोष्टी कानावर पडो
स्वार्थासाठी कोणी न नडो
मंगलमय घटना आयुष्यात घडो.🚩

मागील दोन वर्षातील कटू आठवणींना आता आडवा
एकत्र येऊन एकी आणि समानतेचे दर्शन घडवा
आनंदाच्या साथीने साजरा करूया या वर्षीचा गुढी पाडवा.🚩
– प्रेमा