मार्च २०२० उगवला आणि कोरोनामुळे भारतात

मास्क नावाच्या वस्तूची जनतेला नव्याने ओळख झाली.😷

मास्क वापरावा की नाही या वादात वेगवेगळ्या

विचारसरणीच्या डॉक्टर लोकांमध्येच चांगलीच जुंपली.😷

विचार तज्ञ, वैज्ञानिक तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते आणि सरकार

यांच्या मास्कच्या गोंधळात जनतेची पूर्ती वाट लागली.😷

ड्रेस आणि कपड्यांना मॅचींग मास्क घेण्याची

आवश्यकता काही लोकांना जाणवू लागली.😷

विविध रंग आणि रंगीबेरंगी छटांनी गजबजलेली

मास्कची नवीन बाजारपेठ इथे जन्माला आली.😷

सतत दोन वर्ष तोंडावर मास्क लावून फिरणाऱ्या

जनतेला आता त्याची खूप खूप सवय झाली.😷

मार्च २०२२ उगाऊन ही कोरोना पाठ सोडत नाहीये म्हणून

मास्क आता आपल्यासाठी जीवनावश्यक वस्तू झाली.😷

कोरोनाचे माहिती नाही; पण मास्कच्या वापरामुळे

धुळीच्या कणापासून आपली नक्कीच सुटका झाली.😷

– प्रेमा