अशीच प्रगती करत रहा
यशाचे शिखर गाठत जा.☺️

सर्वांशी प्रेमाने वागत रहा
लोकांच्या मनाचा ठाव घेत जा.☺️

स्वतःच्या कामात प्रामाणिक रहा
असाच यशस्वी व्यावसायिक होत जा.☺️

निरोगी आयुष्य जगत रहा
स्वतःला पण वेळ देत जा.☺️

नात्यात कायम तत्पर रहा
प्रेमाची भाषा समजत जा.☺️

स्वच्छंदी आयुष्य जगत रहा
सहवासाने आनंद देत जा.☺️
– प्रेमा