माणूस म्हटले की जीवनात चढउतार आले,
मानवी शरीरा अंतर्गत उद्भवणारे आजार आले.😇
एखादी आठवण उचंबळून येणे आले,
त्या आठवणीत चिंब चिंब होणे आले.😇
मानवी मनातील विविध छटांचे प्रकटणे आले,
मनाच्या तळाशी बसलेल्या गोष्टींचे खेळ आले.😇
मनातील भावना अनावर होणे आले,
त्या भावनेत अश्रूंनी भिजून जाणे आले.😇
जीवनातील दुःखी आठवणी लपवणे आले,
मनातील सुप्त गोष्टीचे शरीरावर परिणाम होणे आले.😇
खूप गोष्टी घडूनही स्वतःला सांभाळणे आले,
हसत हसत या जीवनाला सामोरे जाणे आले.😇
– प्रेमा
March 30, 2022 at 4:47 am
Khoop chhaan…. 👍👍👍
March 30, 2022 at 7:40 am
Thank you Dada.🙏😊
March 30, 2022 at 6:57 am
यालाच म्हणतात जीवन……!
Congratulations
March 30, 2022 at 7:40 am
Thank you.🙏😊
March 30, 2022 at 3:49 pm
Ye jeevan hai yahi hai iska naam! 😘❤️
March 31, 2022 at 3:23 am
👍😊
Thank u Tai.🙏😊