तो वळून बघून हसला तरी चालतं,
ती वळून बघून हसली तर तुमच्या काय बापाचं जातं?🤔
तो अनेक मुलींशी फ्लर्ट करतो तरी चालतं,
तीने कोणाशी फ्लर्ट केलं तर तुमच्या काय बापाचं जातं?🤔
तो मित्रांच्या घोळक्यात उनाडक्या करतो तरी चालतं,
तिने मैत्रिणीच्या घोळक्यात मोठ्याने हसली तर तुमच्या काय बापाचं जातं?🤔
तो घरकाम न करता बोंबलत फिरला तरी चालतं,
तिचे कामाकडे थोडं दुर्लक्ष झालं तर तुमच्या काय बापाचं जातं?🤔
तो रात्री बेरात्री पार्टी करत राहिला तरी चालतं,
तिने मैत्रिणी सोबत एखादी पार्टी केली तर तुमच्या काय बापाचं जातं?🤔
पुरुषाला सर्व सुट देऊन स्त्रीला सतत बंधनात ठेवणाऱ्या समाजाने विचार करावा की, स्त्री स्वतंत्र वागली तर तुमच्या काय बापाचं जातं?🤔
– प्रेमा
April 14, 2022 at 3:14 am
सही
April 14, 2022 at 10:01 am
धन्यवाद.🙏😊
April 14, 2022 at 3:49 am
तोच खरा या सगळ्याचा पाया आहे… तिला स्वातंत्र्य दिलं की त्याला त्रास होतो….
खूप छान 👍👍👍
April 14, 2022 at 10:02 am
हो ना दादा.
धन्यवाद.🙏😊
April 14, 2022 at 4:18 am
Absolutely correct!!!!
April 14, 2022 at 10:02 am
Thank you Tai.🙏😊
April 14, 2022 at 4:28 am
हं. ते सगळं खरय. पण बदल होत नाही समाजाच्या मानसीकतेत अजूनही. आपला तो 😀 बाब्या. मूलींचं बोलणं पण त्यांना त्रासदायक होत असतं. दृष्टीकोन बदलणं गरजेचं आहे आता
April 14, 2022 at 10:03 am
हो ना.
धन्यवाद!🙏😊