योगाचे ज्ञान विचारले की,
खूप सारी माहिती सांगतात भरभर
असे हे आमचे योगा मास्टर.👍

आमचा दिवस सुरू होतो गुड मॉर्निंग
आणि करून शास्त्रशुद्ध सूर्यनमस्कार
असे हे आमचे योगा मास्टर.☺️

शालेय मैदानी खेळांचे व्हिडिओ टाकून
बालपण उभे करतात आमच्या डोळ्यांसमोर
असे हे आमचे योगा मास्टर.👍

आमच्या ज्ञानात भर पाडण्यासाठी योगा
विषयीचे अवांतर माहिती टाकतात ग्रुपवर
असे हे आमचे योगा मास्टर.☺️

मास्तरांच्या दैनंदिन योगासन आणि
प्राणायाम सत्राने नवचैतन्य पसरते शरीरभर
असे हे आमचे योगा मास्टर.👍

आम्ही कॅमेरा न चालू करता ही न कंटाळता व्यवस्थित सूचना देऊन योगा करवतात भरपूर
असे हे आमचे योगा मास्टर.☺️

शुक्रवार आणि सोमवारी फास्ट व्यायाम घेऊन भरून काढतात रविवार सुट्टीची कसर
असे हे आमचे योगा मास्टर.👍

नवीन नवीन व्यायाम आणि योगा
प्रकार आमच्या समोर करतात सादर
असे हे आमचे योगा मास्टर.☺️

सुदृढ व निरोगी आरोग्याची करतात
ते नेहमीच मनापासुन कदर
असे हे आमचे योगा मास्टर.👍

आम्ही करतो त्यांच्या जवळील गुणांचा
आणि ज्ञानाचा खूप खूप आदर
असे हे आमचे योगा मास्टर.☺️
– प्रेमा