अजून तर मे महिना शिल्लक आहे बाई
ही गर्मी मला सहन होत नाही.😔

उन्हा तान्हात फिरून माझे बेहाल होई
हा उकाडा मला सहन होत नाही.😔

चिल्लापिलांची बाहेर खेळण्याची खूप घाई
ही तापमान वाढ मला सहन होत नाही.😔

बाहेर फिरता अंगाची होई लाही
हे उन्ह मला सहन होत नाही.😔

सर्व उपाय करून आता सुचेना काही
ही गरम हवा मला सहन होत नाही.😔

हव्यासाचा दुष्परिणाम ध्यानी घ्यावा माणसांनी
हा निसर्ग बदल मला सहन होत नाही.😔
– प्रेमा