पदाचा गैरवापर करून
मनमानी करणाऱ्यांचा
हिशोब इथेच होणार.👍
लोकांमध्ये फूट पाडून
अराजकता माजवणाऱ्यांचा
हिशोब इथेच होणार.☺️
जाणून बुजून गैरसमज पसरवून
आपापसात भांडणे लावणाऱ्यांचा
हिशोब इथेच होणार.👍
चमच्यांची फौज गोळा करून व
हाताशी धरून नियमबाह्य वागणाऱ्यांचा
हिशोब इथेच होणार.☺️
कामात जात धर्म आणून बिनकामी
जात भाईंना प्रोत्साहन देणाऱ्यांचा
हिशोब इथेच होणार.👍
साहेबांच्या मागेपुढे राहून चोंबडेपणा
करत पैसे मिळवणाऱ्या फुकट्यांचा
हिशोब इथेच होणार.☺️
मानसिक त्रास देऊन लोकांना
काम सोडण्यास भाग पाडणाऱ्यांचा
हिशोब इथेच होणार.👍
खुर्चीच्या लोभाला भाळून
लोकांच्या पोटावर पाय देणाऱ्यांचा
हिशोब इथेच होणार.☺️
– प्रेमा
April 9, 2022 at 6:06 am
खूपच छान… आपल्या चांगल्या वाईट कर्मांचा हिशोब इथेच होणार 👍👍👍
April 9, 2022 at 6:16 am
धन्यवाद दादा.🙏😊
April 9, 2022 at 6:40 am
Kharach uttam!
April 11, 2022 at 3:56 am
Thank you.🙏😊
April 9, 2022 at 8:18 am
सत्य आहे … सगळा हिशोब इथेच होणार
April 11, 2022 at 3:57 am
धन्यवाद!🙏😊
April 10, 2022 at 1:37 am
आयुष्यात शेवटी काय आहे.. सगळा हिशोब इथेच संपतो
April 11, 2022 at 3:57 am
धन्यवाद!🙏😊