तुझा आवाज ऐकण्यासाठी
अतुर माझे कान ग; पण
तू कधी बोलणार आहेस?😍

तूझ्या मनीची हाक ऐकण्यास
अधीर माझा जीव ग; पण
तू कधी बोलवणार आहेस?😍

तुझ्या मैत्रीच्या होकारासाठी
उतावळे माझे हात ग; पण
तू कधी स्वीकारणार आहेस?😍

तुझ्या प्रेमात हारण्यासाठी
तयार माझे जीवन ग; पण
तू कधी भेटणार आहेस?😍

तुझ्या मधुर मिलनासाठी
व्याकूळ माझे मन ग; पण
तू कधी माझीच होणार आहेस?😍

तुझ्या सुखासाठी माझे
सर्वस्व तुला अर्पण ग; पण
तू कधी सामावून घेणार आहेस?😍
– प्रेमा