आंबेडकर जयंती कोणाची?
कोणताच भेदभाव न करता समोरच्याला
समानतेने वागवणाऱ्या प्रत्येकाची.👍

आंबेडकर जयंती कोणाची?
पद, पैशाला न भुलता सत्याची बाजू घेऊन
समोरच्याला विचारातून नमवणाऱ्या प्रत्येकाची.😊

आंबेडकर जयंती कोणाची?
पद प्रतिष्ठेचा वापर करून अन्याय न करता
समानता, बंधुभाव आणि एकतेचे बीज पेरणाऱ्या प्रत्येकाची.👍

आंबेडकर जयंती कोणाची?
भीमाच्या नावाचा उदो उदो न करता त्याने
सांगितलेल्या मूल्यांचे पालन करणाऱ्या प्रत्येकाची.😊

आंबेडकर जयंती कोणाची?
स्त्री पुरुष समानतेच्या नावाने न ओरडता तिला मनापासून मानून कृतीतून दाखवून देणाऱ्या प्रत्येकाची.👍

आंबेडकर जयंती कोणाची?
जातीभेद न करता कामाला महत्त्व देऊन
प्रामाणिकपणे संधी देणाऱ्या प्रत्येकाची.😊

आंबेडकर जयंती कोणाची?
कोणत्याच प्रलोभनाला बळी न पडता
स्वातंत्र्य अबाधित ठेवणाऱ्या प्रत्येकाची.👍

आंबेडकर जयंती कोणाची?
भीमाच्या नावाने भाषणे देत न फिरता त्याचे
विचार अंगिकारून जीवन जगणाऱ्या प्रत्येकाची.😊

भीमाने सांगितलेले मूल्य आणि तत्व जपणाऱ्या सर्वांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.🙏👍😊
– प्रेमा.