सगळ्यांना सांभाळत टीमला एकत्र

बांधून ठेवणं कोणी तुझ्याकडून शिकावं.🤗

 

वेळेतून वेळ काढून फोटोग्राफीचा

छंद जपणं कोणी तुझ्याकडून शिकावं.🤗

 

कामांना सांभाळत घरच्यांना महत्त्वाचा

वेळ देणं कोणी तुझ्याकडून शिकावं.🤗

 

बढाया न मारता कृतीतून स्त्री – पुरुष

समानता जपणं कोणी तुझ्याकडून शिकावं.🤗

 

संसार सांभाळत श्रेष्ठ समाजकारण

करणं कोणी तुझ्याकडून शिकावं.🤗

 

प्रामाणिकपणे काम करून यशाचे

शिखर गाठणं कोणी तुझ्याकडून शिकावं.🤗

 

पूर्ण होवो तुझ्या मनातील सर्व इच्छा

प्रिय गणेश वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎊🎉

– प्रेमा.