लग्न म्हणजे दोन मनाच्या मिलना

सोबत दोन कुटुंबाचं एकत्र येणं.🤗

लग्न म्हणजे ओळखी सोबत आपल्या

साथीदाराला नव्याने जाणून घेणं.🤗

लग्न म्हणजे स्वतः सोबत जोडीदाराच्या

मनाचा विचार करून काळजी घेणं.🤗

लग्न म्हणजे सख्या / सखीच्या प्रेमा सोबत

विश्वासाने स्वतःला अलगद झोकून देणं.🤗

लग्न म्हणजे दोन मनाच्या कोपऱ्यात उठणारं

प्रेमाचं वादळ कोमल स्पर्शाने हळूच क्षमवणं.🤗

लग्न म्हणजे एकमेकांसोबत एकमेकांच्या

जवळील नातलगांना आपलंसं करणं.🤗

लग्न म्हणजे सामंजस्या सोबत प्रेमाचा

वर्षाव करत एकमेकांत समरस होणं.🤗

लग्न म्हणजे दिले घेतलेल्या वचनां

सोबत सुख दुःखाचे क्षण एकत्र जगणं.🤗

– प्रेमा