तुमची काळजी असणाऱ्या व्यक्तींना
एवढेही दुखवू नका की ते
नाईलाजाने तुमच्यापासून दूर जातील.😊
तुमची काळजी असणाऱ्या व्यक्तींना
एवढेही टोचून बोलू नका की ते
तुमच्याशी बोलणे टाळतील.😊
तुमची काळजी असणाऱ्या व्यक्तींना
एवढेही अपमानित करू नका की ते
तुमचा तिरस्कार करतील.😊
तुमची काळजी असणाऱ्या व्यक्तींना
एवढेही निर्बुद्ध समजू नका की ते
तुम्हाला वेडे समजतील.😊
तुमची काळजी असणाऱ्या व्यक्तींना
एवढेही त्रास देऊ नका की ते
तुमच्याशी असलेले नाते विसरतील.😊
तुमची काळजी असणाऱ्या व्यक्तींना
एवढेही गृहीत धरू नका की ते तुमच्या
आयुष्यातून कायमस्वरूपी निघून जातील.😊
– प्रेमा
May 18, 2022 at 6:07 am
Absolutely true!!!
May 18, 2022 at 8:27 am
Thank you Tai.🙏😊
May 18, 2022 at 7:10 am
अगदी खरय 👍👍👍👍
May 18, 2022 at 8:41 am
प्रेमा आपली तुमची काळजी असणाऱ्या ही कविता ऱ्हदयाला भिडणारी आहे
खरच खूप छान शब्द रचना आहे.
वाचून खूप आनंद झाला.
May 18, 2022 at 11:01 am
धन्यवाद!🙏😊
June 1, 2022 at 11:43 am
❤️ अप्रतिम 🎉
June 10, 2022 at 11:48 am
धन्यवाद.🙏😊