अजूनही वाटतं घरात आहे तुमचा सहवास,
कधी कधी होतो तुम्ही समोर असल्याचा भास.😔
एखादी घटना घडली की नकळत वळतो तुमच्या आठवणींकडे मोर्चा,
मॉम अशा बोलल्या असत्या, तश्या केल्या असत्या असते हीच चर्चा.☺️
सुखाच्या क्षणी कुटुंबातील मुखिया म्हणून तुमचा चेहरा समोर येतो,
कोणतेही काम करताना तुम्हाला न आवडती गोष्ट टाळण्याचा प्रत्येक सदस्य प्रयत्न करतो.😊
कोरोनाच्या काळात अघटीत असे घडले,
देवाने तुम्हाला आमच्यापासून हिरावून घेतले.😐
तुमच्या सोबतीने जगण्याचे क्षण हे स्वप्नच म्हणून राहिले,
देव जाणो हसत खेळत असणारे कुटुंब उद्ध्वस्त का केले.😒
प्रिय मॉम खात्री आहे तुम्ही गेलात तिथे पण सुखी राहाल,
तुमच्या या प्रियजनांना तुमच्या आशीर्वादाने कायम सुखात पहाल.🤗
– प्रेम
May 14, 2022 at 5:08 am
Wwwaahhh wwwaahhh Prema…. Massstach 👍👍👍👍
एकदम मनाला भिडणारं 👍
May 14, 2022 at 5:23 am
धन्यवाद दादा.🙏
May 14, 2022 at 5:46 am
Beautiful words for tumha saglyinchi mom. Dil ko chu gayi. 🤗🤗🤗
May 14, 2022 at 5:53 am
Thank You.🙏
May 14, 2022 at 7:20 am
😭😭😭😓😓😞
May 17, 2022 at 3:41 am
😔